आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • 2 Sisters Who Were Going To School In Pune Met With Death A Two wheeler Collision With A Container, Both Of Them Died On The Spot; Trucker Pass

पुण्यात शाळेत निघालेल्या 2 सख्ख्या बहिणींना मृत्यूने गाठले:कंटेनरची दुचाकीस धडक, दोघींचा जागेवरच चेंदामेंदा; ट्रकचालक पसार

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात 2 सख्ख्या बहिणींचा जागेवरच मृत्यू झाला आहे. दोघी बहिणी आपल्या मामासोबत दुचाकीवरुन जात असताना ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे. कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन येथे हा अपघात झाला आहे.

छकुली कुमार शितोळे (वय १७) राजश्री कुमार शितोळे (वय 10 दोघीही रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली,पुणे ) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छकुली ही इयत्ता अकरावीला लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल ज्युनियर कॉलेज तर राजश्री ही इयत्ता सहावीत शिकत होती. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळेत जात असताना लोणी स्टेशन चौकात एका कंटेनर ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघींचाही चेंदामेंदा झाला व जागेवरच मृत्यू झाला आहे.

जागेवरच चेंदामेंदा

अचानक घडलेल्या घटनेने शितोळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अपघाताची भीषणता एवढी होती की, त्या दोन सख्ख्या बहिणीनीच्या अंगावर कंटेनर गेल्याने त्यांचा त्यात चेंदामेंदा झाला. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांची पथके त्याला पकडण्यासाठी रवाना झाली आहेत.

ट्रकने मोटरसायकलला दिली धडक

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले, शनिवारी सकाळी साडेसात वाजता पांडुरंग नवनाथ भिक्षे (वय 42 वर्षे, रा. काळभोर नगर, ता. हवेली ,जि. पुणे) हे कवडी पाठ येथून त्यांच्या भाची गायत्री नंदकुमार शितोळे (वय 17 वर्षे) व राजश्री नंदकुमार शितोळे ( वय 10 वर्ष) यांना कन्या शाळा लोणी काळभोर मध्ये सोडण्याकरता जात असताना लोणी स्टेशन चौक या ठिकाणी एका ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला मागून धडक दिली.

ट्रकचालक पसार

या अपघातात मोटारसायकल वरील मामा आणि मुली वेगळ्या ठिकाणी पडल्या नंतर ट्रक मुलींच्या अंगावरून गेल्याने त्या जागीच मृत झाल्या. मामाला कुठेही दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर ट्रक चालक ट्रकसह पळून गेला आहे. त्याचा तपास सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...