आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकी विमाच्या नावाने दुचाकींचा काढला विमा:2 हजार 286 मोठ्या वाहनांना दुचाकी असल्याचे भासवले; कंपनीला कोट्यवधी रुपयांचा गंडा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटारींसह इतर मोठ्या वाहनांच्या इन्शुरन्सच्या नावाखाली जास्त पैसे घेऊन एजंटने थेट वाहनांचा संवर्ग बदलत इन्शुरन्स कंपनीसह वाहनमालकांची फसवणूक केली आहे. तसेच यामध्ये तीनचाकी,चारचाकी व दुचीकी असल्याचे सांगतिले. अशाप्रकारे तब्बल 2 हजार 286 मोठी वाहने दुचाकी असल्याचे भासवून आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीला कोट्यावधींचा गंडा घातला आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी अनंत कचरे याच्यासह इतरांविरूद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयसीआयसी लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी स्वानंद जगदीश पंडीत (वय 41 रा. बंडगार्डन) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना एप्रिल 2021 ते ऑक्टोबर 2022 कालावधीत घडली.

इतक्या रूपयांची केली फसवणूक

स्वानंत हे बंडगार्डन परिसरातील ढोले-पाटील रस्त्यावर असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीत तपासणी अधिकारी आहेत. त्यांच्याकडे प्राप्त विमा पॉलिसी तपासताना त्यांनी एका दुचाकीचा क्रमांक पडताळून पाहिला. त्यावेळी संबंधित क्रमांक टेम्पोच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार इन्शुरन्स कंपनीने शासनाच्या वाहन पोर्टलवर माहिती काढली असता, एजंटांनी अशाच पद्धतीने 2 हजार 286 मोठ्या वाहनांना दुचाकी असल्याचे भासवून विमा काढल्याचे उघडकीस आले. त्यासाठी आरोपींनी मोटार मालकांकडून त्यापटीत रक्कम घेउन दुचाकींचा विमा काढल्याचे निष्पन्न झाले. नागरिकांकडून मोटारींसह इतर चारचाकी वाहनांचा इन्शुरन्स काढण्याची रक्कम घेत चक्क वाहनांचा संवर्ग बदलून दुचाकी असल्याचे भासवित फसवणूक केली.

वाहनमालक इन्शुरन्सला मुकणार

अपघातानंतर वाहनमालकांना वाहनांचे नुकसान आणि थर्ड पार्टी विमा संरक्षण दिले जाते. मात्र, एजंटाने मोटारींसह इतर वाहनांऐवजी वाहनाचा प्रवर्ग बदलून तब्बल 2 हजार 286 दुचाकींचे क्रमांक वापरून विमा कंपनीसह वाहन मालकांना गंडा घातला. त्यामुळे संबंधित वाहन मालकांना अधिकृत विमा मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मोटारींसह इतर वाहनांचा कमी किंमतीत इन्शुरन्स काढून देण्याच्या बतावणीने एजंटाने वाहनमालकांना गंडा घातला आहे. आरोपींनी मोटीरींच्या विम्यासाठी रक्कम घेत वाहन संवर्गात बदल केला. मोठी वाहने दुचाकी असल्याचे भासवून वाहन मालकासह कंपनीची फसवणूक केली आहे.

- श्रीकांत सावंत, पोलिस उपनिरीक्षक, कोरेगाव पार्क पोलिस ठाणे

बातम्या आणखी आहेत...