आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर ओळख दाखवली नाही:दोघांना काेयत्याचा धाक दाखवून मारहाण, पुण्यात 5 जणांविरोधात गुन्हा

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टाग्रामवर मला ओळखत नाही का, तुला माझी ओळख दाखवू का, अशी धमकी देत काही तरुणांनी दोघांना मारहाण केली. याशिवाय हवेत कोयता फिरवून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. कांचनमधील महात्मा गांधी रस्त्यावर 2 ऑगस्टरोजी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आकाश म्हस्के, साई म्हस्के, प्रणव म्हस्के, सुजित म्हस्के, रोहन साळवे, अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. विजय कड (वय 45) यांनी याबाबत आरोपींविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, विजय यांचा मुलगा करण आणि त्याचे मित्र प्रणव खांडेकर, उदय कसबे मित्राकडे चालले होते. त्यावेळी आरोपी आकाशने प्रणवला तू मला इन्स्टाग्रामवर ओळखत नाही का, तुला माझी ओळख दाखवू का, अशी धमकी देत मारहाण केली. त्यावेळी उदयने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता. आरोपीने त्यालाही मारहाण केली. त्यानंतर आरोपी रोहनने पिशवीतून कोयता बाहेर काढून हवेत फिरवत परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके पुढील तपास करीत आहेत.

शस्त्राने वार करून एकाचा खून

धारदार शस्त्राने वार करून एकाला गंभीर जखमी केल्याची घटना 23 मार्चला कोंढव्यातील खडी मशीन चौकात घडली होती. याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील खडी मशीन चौकातील एका बंद हॉटेलजवळ अनोळखी तरुणावर शस्त्राने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...