आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौड:पुण्यात ‘संविधान सन्मान दौड’मध्ये 50  विदेशींसह 2 हजार विद्यार्थी धावणार

पुणे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी (२६ नोव्हेंबर) भारतीय संविधान दिनानिमित्त ‘संविधान सन्मान दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. या दौडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबतच पन्नासहून अधिक परदेशी विद्यार्थी धावणार आहेत. या दौडला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याबाबतची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे संचालक डॉ.विजय खरे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. डॉ.खरे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या संविधानाबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने या संविधान सन्मान दौडचे आयोजन केले आहे.

दहा किलोमीटर प्रकारासाठी मार्ग प्रारंभ : विद्यापीठ मुख्य इमारतीशेजारील संविधान स्तंभ -आयुका रोड -डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक औंध रोड- डावीकडे वळून शाहू महाराज चौक बोपोडी येथे वळसा मारून - डॉ. आंबेडकर चौक औंध रोड येथून डावीकडे वळून -खडकी स्टेशन -उजवीकडे पार्क रोडवरून कालीबारी समिती -जनरल जोशी प्रवेशद्वार -विद्यापीठ लेडीज होस्टेल , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा -डॉ. आंबेडकर पुतळा - मुख्य इमारत संविधान स्तंभ येथे समारोप.

बातम्या आणखी आहेत...