आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीफ’ 2 ते 9 फेब्रुवारीदरम्यान हाेणार:चित्रपट महोत्सव संचालक, दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल यांची माहिती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पीफ) आता नव्या वेळापत्रकासह रसिकांसमोर येणार आहे. २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान पीफ आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावर्षी महोत्सवासाठी ७२ देशांमधून १५७४ चित्रपट आले असून त्यापैकी १४० चित्रपट दाखवले जाणार असल्याची माहितीही पटेल यांनी दिली.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे आणि चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते या वेळी उपस्थित होते. यंदा महोत्सव ऑफलाइन पद्धतीने होणार असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया ५ जानेवारी रोजी www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर तर चित्रपटगृहांबाहेरील स्पॉट नोंदणी प्रक्रिया १९ जानेवारी पासून सुरू होणार आहे.

जागतिक स्पर्धा विभागातील १४ चित्रपटांची घोषणा पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथे महोत्सवातील चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. मराठी स्पर्धा विभागात ७ चित्रपटांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...