आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल शॉपी फोडणाऱ्या परप्रांतीय टोळीवर पुणे पोलिसांची बिहारमध्ये कारवाई:22 लाखांचा ऐवज जप्त, 97 मोबाईलचा समावेश

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाईल शॉपी फोडून लाखो रूपयांची घरफोडी करणाऱ्या सराईत परप्रांतीय टोळीला हडपसर पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे.

सदरील भामट्यांमकून पाच मोबाईल शॉपी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून 22 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 97 मोबाईलचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे, एपीआय विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे उपस्थित होते.

हे आहेत आरोपी

साहिल अनिल मोरे (वय 20 रा. देशमुखवाडा शिवणे,पुणे) संकेत प्रकाश निवगुणे (वय 22 रा. बानगुडे चाळ, वारजे माळवाडी,पुणे) लक्ष्मण आण्णा जाधव (वय 34 रा. हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरुड,पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सीसीटीव्हीमुळे मिळाली माहिती

उरळी देवाची परिसरातील न्यु साई मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी 19 लाख रुपयांचे 102 मोबाईल चोरी केल्याची घटना 23 ऑक्टोबरला घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांनी वापरलेल्या मोटारीची माहिती काढली. पोलिस अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधरकर यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित साहिल मोरे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार संकेत निवगुणे, लक्ष्मण ऊर्फ आण्णा संतोष मोरे, गजानन मोरे, पोपट धावडे यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

97 मोबाइल जप्त

पोलिसांनी संकेत निवगुणे याला ताब्यात घेतले असता गुन्हयातील सुत्रधार लक्ष्मण जाधव हा बिहारमध्ये असल्याची पथकाला मिळाली. पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, शाहीद शेख, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे बिहारला गेले. एपीआय विजयकुमार शिंदे आणि संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणामुळे आरोपी मोनुसिंग (रा. बिश्णपुरा काला,बिहार) याच्या घरी छापा टाकून लक्ष्मणला ताब्यात घेत 97 मोबाइल जप्त केले.

यांनी केली कारवाई

ही कामगिरी अपर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे, पोलिस निरीक्षक विश्वास डगळे एपीआय विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंधरकर यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...