आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका बांधकाम व्यावसायिकाने दिलेली रोकड मालकाच्या कार्यालयात जमा करण्याऐवजी कामगाराने चोरट्यांनी लुटमार केल्याचा बनाव करुन २२ लाख ६५ हजार घेउन जाणार्या कामगाराला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
बसप्पा वाल्मिक शिंगरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत व्यावसायिक नंदकुमार शहा यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नंदकुमार शहा हे बांधकाम व्यावसायिक असून २३ मे रोजी त्यांनी कामगार बसप्पाकडे २३ लाख ६५ हजारांची रोकड कार्यालयात जमा करण्यासाठी ताब्यात दिली. परंतु, मोठी रक्कम पाहून कामगाराने लुटीचा स्वतः बनाव रचला. दुचाकीवरुन घरी जाताना निलायम पुलाशेजारी चार चोरट्यांनी त्याचे अपहरण मारहाण करीत रोकड चोरुन नेल्याचे मालकाला खोटे सांगितले.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, शहा यांनी तातडीने कामगार बसप्पासह दत्तवाडी पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तयार करण्यात आली.
लॉ कॉलेज रोडपासुन विश्रामबाग हद्दीतील पेपर गल्ली ते दत्तवाडी पोलीस ठाणे निलायमपुल स्वारगेट कोथरुड भुगाव परीसरातील १०० सासीटीव्हि कॅमेरांची पडताळणी केली. आरोपी बसप्पा वाल्मिक शिंगरे याच्याकडे सलग तपास पथकातील कर्मचार्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी केली असता, त्याच्या सांगण्यात आणि जबाबात विसंगती आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी कलेल्या कसून चौकशीत त्याने लुटमार झाली नसल्याचे सांगत स्वतः पैसे ठेवल्याची कबुली दिली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.