आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 22 वे साहित्यिक कलावंत संमेलन:कवी इंद्रजित भालेराव, अभिनेता प्रसाद ओक यांना वाग्यज्ञे' साहित्य व कलागौरव पुरस्कार जाहीर

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, पुणेतर्फे आयोजित 22 वे साहित्यिक कलावंत संमेलन दिनांक 24 आणि 25 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. कवी इंद्रजित भालेराव, अभिनेता प्रसाद ओक यांना यंदाचा वाग्यज्ञे' साहित्य व कलागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि 22 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे मुख्य आयोजक दिलीप बराटे यांनी कळविली आहे.

भालेराव यांचे 40 हून अधिक ग्रंथ प्रकाशीत

कवी, लेखक आणि वक्ते प्रा. इंद्रजित भालेराव यांनी विपूल लेखन केले असून त्यांचे चाळीसहून अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत. महाराष्ट्र शासनासह विविध संस्थांचे 25 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांची 'पिकपाणी', 'आम्ही कबाडाचे धनी', 'दूर राहिला गाव', 'लढायला शिक', 'भूमिनिष्ठांची मांदियाळी', 'लळा', 'आसवातले आर. आर. आबा' ही पुस्तके विशेष गाजलेली आहेत.

ओक यांनी गाजवली 30 हून अधिक चित्रपट

तर प्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी 30 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांसह विविध मालिका तसेच नाटकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत. 'आभाळ माया', 'वादळवाट', 'अवघाची संसार', 'बंदिनी', 'होणार सून मी या घरची' या त्यांच्या रसिक प्रिय मालिका आहेत. तर 'हिरकणी', 'कच्चालिंबू', 'निर्माल्य', 'धर्मवीर' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. 'चंद्रमुखी', 'भद्रकाली', 'हिरकणी', 'कच्चा लिंबू' या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तम अभिनयामुळे आणि दिग्दर्शनामुळे त्यांना आजवर विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

याधीही यांना मिळाले आहे पुरस्कार

यापूर्वी 'वाग्यज्ञे' साहित्य व कलागौरव पुरस्काराने पंडित हृदयनाथ मंगेशकर, कवी ग्रेस, यशवंत देव, मधु मंगेश कर्णिक, सुलोचना चव्हाण, जगदिश खेबूडकर, डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे, मृणाल कुलकर्णी, सयाजी शिंदे, मोहन जोशी, प्रा. शेषराव मोरे, उत्तम कांबळे, मल्लिका अमर शेख, प्रा. रावसाहेब कसबे, डॉ. अरुणा ढेरे, रवी परांजपे, श्रीनिवास खळे, सुरेश वाडकर आणि दिलीप प्रभावळकर यांना गौरविण्यात आले आहे. 22 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...