आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:23 रिसॉर्ट््समध्ये वेलनेस मेडिकल टुरिझम हाेणार, काेराेनामुळे उत्पन्न घटले, एमटीडीसीचा अाता देशांतर्गत पर्यटनवृद्धीचा प्रयत्न

पुणे (जयश्री बोकील)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे सर्व उद्योगांवर विपरीत परिणाम हाेऊन पर्यटन उद्योगाला सर्वाधिक फटका बसला आहे. पुढील किमान एक वर्षाचा काळ तरी पर्यटनाचा धोका कुणी पत्करणार नाही, असा पर्यटन तज्ञांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने देशांतर्गत पर्यटनावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: राज्यातील व अन्य राज्यांतील पर्यटकांना आकर्षित करण्यात येत आहे. राज्यातील एमटीडीसीच्या २३ रिसॉर्ट््समध्ये ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ सुरू करण्यात येणार असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन महामंडळाच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे. जोपर्यंत परिस्थिती सावरत नाही, तोपर्यंत अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यताही नाही. तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना आखून, आगामी काळासाठी एक निश्चित रोड मॅप ठरवला आहे असे अभिमन्यू काळे यांनी स्पष्ट केले. महामंडळाचे कर्मचारी सध्याच्या काेराेनाच्या कठीण काळातही परिसर आणि खोल्या सुसज्ज व स्वच्छ ठेवत आहेत. पर्यटक निवासांचे किरकोळ दुरुस्त्यांसह निर्जंतुकीरण करण्यात येत आहे. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाइझ करणारे स्प्रे अशी व्यवस्थाही करण्यात येणार अाहे. आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. सरकारने पर्यटकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पाहणे बंधनकारक केल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

देशी पर्यटक असतील केंद्रस्थानी
‘येणाऱ्या काळात देशी पर्यटक केंद्रस्थानी ठेवून पर्यटन सुविधांचा विचार केला जाणार असल्याचे एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले. महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहिती वेबसाइट आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे. लवकरच शासनाच्या आदेशानुसार रिसॉर्ट खुली करण्यात येणार असून अधिक काळजी घेण्यात येणार आहे.

पर्यटकांसाठी लवकरच पॅकेज
लाॅकडाऊनमुळे लाेक शारीरिक व मानसिकदृष्ट्या प्रचंड त्रासलेले आहेत. लॉकडाऊननंतर बाहेर पडण्याची इच्छा असणाऱ्या मंडळींना पर्यटक निवासात सध्याच्या वातावरणात ‘वेलनेस - मेडिकल टुरिझम’चा पर्याय दिला जाणार आहे. अशा लोकांसाठी एक चांगले पॅकेज महामंडळाच्या पर्यटक निवासात मिळणार आहे. हे पॅकेज दोन ते आठ दिवस या कालावधीचे असेल. त्याचा सविस्तर तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे.
वैद्यकीय कारणांसाठी पर्यटकांना सुविधा

बातम्या आणखी आहेत...