आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमली पदार्थांचा विळखा:सोलापूरहून पुण्यात इंडिका कारमध्ये विक्रीसाठी आणलेला 24 किलाे गांजा जप्त

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूर जिल्हयातील तीन इसम टाटा इंडिका कारमध्ये गांजा भरून ताे पुण्यात विक्रीसाठी घेऊन आले असताना, त्यांना वाकड परिसरात पाेलिसांनी संशयितरित्या हालचाली दिसून आल्याने थांबवत गाडीची झडती घेतली. त्यावेळी गाडीत 3 लाख 36 हजार रुपये किंमतीचा एकूण 24 किलाे 105 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. याप्रकरणी वाकड पाेलिसांनी बुधवारी तीन जणांना अटक केली.

श्रीकांत लिंबाजी राठाेड (वय 33, रा.बालेवाडी,पुणे, मु. रा. मुळेगाव, दक्षिण साेलापूर), सुनील लालसिंग राठाेड (31, रा. दक्षिण साेलापूर) व तानाजी दगडू पवार (42, रा. अक्कलकाेट, साेलापूर) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. बुधवारी हे तिघेजण साेलापूर येथून पुण्यात कारमध्ये गांजा विक्रीसाठी घेऊन आले हाेते. पाेलिसांच्या झडतीत आराेपींनी अनाधिकाराने बेकायदेशीरित्या गांजा हा अंमली पदार्थ बाळगल्याचे दिसून आल्याने सदर 24 किलाे गांजा जप्त करण्यात आला. तसेच आराेपींजवळील 30 हजार रुपये किमतीचे तीन माेबाईल व तीन लाख रुपये किंमतीची एक पांढरे रंगाची टाटा इंडिका कार असा एकूण सहा लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत वाकड पाेलिस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...