आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुरीचे प्रमाणपत्र:स्वाधार योजनेच्या 25 कोटी निधीचे विद्यार्थ्यांना लवकरच होणार वाटप

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाजकल्याण विभागाच्या स्वाधार योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जदारांना सामाजिक न्याय भवन येथे योजनेच्या मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी लवकरच विद्यार्थ्यांना वाटप केला जाईल, अशी माहिती समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. डॉ. नारनवरे म्हणाले की, स्वाधार योजनेअंतर्गत २५ कोटी रुपये प्राप्त झाले. शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येतो.

बातम्या आणखी आहेत...