आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • 27th International Sindhi Conference Organized In Pune Sindhi Brothers From All Over The World Will Participate Rajnath Singh, Chief Minister, Deputy Chief Minister Will Be Present

पुण्यात 27 व्या आंतरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचे आयोजन:राजनाथ सिंग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुहिंना सिंधी-पुणे आणि आल्यानस ऑफ ग्लोबल सिंधी असोसिएशन आयोजित 27 व्या आंतरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भारतात तिसऱ्यांदा तर पुण्यात पहिल्यांदाच होत आहे. पुण्यातील कोरियंथन्स रिसॉर्ट अँड क्लब येथे दिनांक 4 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर असे तीन दिवस हा कार्यक्रम पार पडेल अशी माहिती डॉ. पितांबर (पीटर) धलवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मनोहर फेरवाणी, मोती मिलाणी, रमेश छाबिया, डॉ. राजीव कृष्णानी, सुरेश रुपाजी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर 5 नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. 6 नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेदेखील उपस्थित असणार आहेत.

सिंधी सम्मेलनात साधू वासवानी मिशन-पुणेच्या दीदी कृष्णा, साई सद्राम (सिंध), साई मोहनलाल (लखनी). साई कालीराम (उल्हासनगर). साई राजे (अमरावती) यांसारख्या सिंधू गुरुंकडून शुभाशिर्वाद देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार महेश जेठमलानी, खासदार शंकर ललवाणी, माजी मंत्री परमानंद खट्टर, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, डॉ. रविप्रकाश टेकचनावी,

माजी खासदार सुरेश केसवाणी, अलायन्स ऑफ ग्लोबल सिंधी असोसिएशनचे अध्यक्ष दत्तुक शाह, डॉ. राजीव कृष्णानानी, मा. सतिश रायसिंघानी (स्पेन), श्रीमती रमोला मोटवानी (अमेरिका) यांची उपस्थिती असणार आहे. सदर संमेलन तीन दिवस चालणार असून, यामध्ये विविध भारतीय सिंधी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता दीपप्रज्वलन आणि इष्ट देवता साई झुलेलालजींच्या मूर्तीचे पूजन करून संमेलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता राजनाथसिंह यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. तर दुसऱ्या दिवशी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असून त्यांचे मार्गदर्शन सिंधी समाजाला करण्यात येणार आहे. त्यानंतर सिंधी सांस्कृतिक छेज नृत्य जगप्रसिद्ध प्रेम भाटियाजी यांच्या कलाविष्काराने होणार आहे.

दिनांक 6 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती असेल. सिंधी संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये महेश चंदर आणि पिंकी मैदासानी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. झुलेलाल कीर्तन, साधू वासवानी मिशनच्या दीदी कृष्णा यांचे प्रवचन, सिंधी छेज सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमही होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...