आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:गुंतवणुकीच्या बहाण्याने 29 लाख रुपयांचा गंडा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूर येथे राहत असलेल्या एकाचा विश्वास संपादन करुन त्याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दुप्पट परतावा मिळेल, असे अमिष भामट्यांनी दाखवले. त्यानंतर संबंधिताने २९ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये केली असता त्यांना परतावा न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी केशव विठ्ठलराव पांडे (४५, रा.वसंत विहार, साेलापूर) यांनी काेथरुड पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनंतर विशालभाई गाेविंदभाई रावल (२६,रा.गुजरात), मयूरभाई चाैधरी (२८,रा.गुजरात) व गाेपालभाई रावल (रा.गुजरात) या तीन आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १७ मार्च २०२१ ते २६ मार्च २०२१ यादरम्यान पुण्यातील काेथरुड परिसरातील भुसारी काॅलनी येथील रिचमंड पार्क येथे घडला आहे.

बातम्या आणखी आहेत...