आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:पंचतारांकित हाॅटेलची मेंबरशिप देतो म्हणत पावणेतीन लाखांची फसवणूक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंचतारांकित हाॅटेलची आकर्षक ऑफर देण्याच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाला पावणेतीन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. आठ आराेपींवर येरवडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रितेशकुमार अशाेककुमार बजाज (४६, रा. खराडी, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार काेर्टीयार्ड हाॅलिडेज वर्ल्ड प्रा. लि. कंपनीचे आशिषकुमार आराेरा, साहिब अलम, दीपक काैशल, प्रभांशू गाैर, अकशित कक्कर, रेहान मलिक, गजेंद्रसिंग, वंश ठाकूर या आराेपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ ऑक्टोबर २०२१ ते ३० अॉगस्ट २०२२ यादरम्यान घडला.

बातम्या आणखी आहेत...