आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्याच्या ग्रामीण रहिवासी भागात गुरूवारी सकाळी बिबट्याची 3 पिल्ले आढळुन आल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे अधिकारी जरीही त्यांना सोबत घेऊन गेले असले तरीही, मादा बिबिट्या पिल्लांच्या शोधात गावावर हल्ला करू शकते असे स्थानिकांचे म्हणणे आहे. ताब्यात घेतलेल्या पिल्ल्यांचे वय ५ ते ६ दिवस असावे असे सांगण्यात येत आहे. मावळ वन विभागाची टीम सध्या पिल्लांना स्थानिक पशु रूग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले आहेत.
अधिक माहितीनुसार, ही घटना आंबेगाव च्या वालटी गावची आहे. असे समजले जात आहे की, मादा बिबट्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्याच्यासाठी अन्नाच्या शोधात गेली असावी. गुरूवारी सकाळी पंढरीनाथ नामदेव लोंढे या शेतकर्यांला हा सर्व प्रकार दिसला आणि त्यांनी याची पहिली वार्ता सरपंच नंतर वन विभागाच्या अधिकार्यांना दिली. पंढरीनाथ हे स्वत:च्या शेतात ऊसाची कापणी करण्यासाठी गेले असताना त्यांच्या निदर्शनास ही पिल्ले आली.
पिल्लांच शारिरीक स्वास्थ व्यवस्थित
पंढरीनाथ नामदेव लोढे यांनी सांगितले की, फोन केल्यानंतर एका तासाभरात वनअधिकारी पोहोचले आणि पिल्लांना सोबत घेऊन गेले. अधिकार्यांनी सांगितले की, पिल्लांचे स्वास्थ ठिक आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांचा जन्म झाला आहे. प्रत्येकाचे वजन जवळपास एक किलो इतके आहे. लवकरच त्यांना त्याच्या आईजवळ सोडण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.