आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडूशेठ ट्रस्टकडून ससून रुग्णालयास चपाती मशीन भेट:3 तासामध्ये बनतील 3 हजार चपात्या; रुग्णांना मिळणार मोफत जेवण

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयूग तरुण मंडळाच्या वतीने ससून रुग्णालयातील किचन विभागाला अत्याधुनिक चपाती मशिन भेट देण्यात आली. अवघ्या तीन तासांत तब्बल 3 हजारहून अधिक चपात्या या मशिनद्वारे तयार होणार आहेत. ससून रुग्णालयात दिवसाला 1296 रुग्णांना दोन्ही वेळेचे जेवण मोफत दिले जाणार आहे.

अनोखा उपक्रम

राजाराम अंबाजी मराठे व सुमती राजाराम मराठे यांच्या स्मरणार्थ गणेशभक्त सतीश मराठे यांच्या पुढाकाराने हे मशीन देण्यात आले आहे. चपाती मशीनचे पूजन करुन या मशिनच्या प्रत्यक्ष वापराला नुकतीच सुरुवात झाली आहे. यावेळी देणगीदार सतीश मराठे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, अमोल केदारी, ससूनचे डॉ.हरिष ताटीया, डॉ.उषा निकुंभ, मुख्य आहारतज्ञ स्वाती बरेकर, चैताली शिंपले, आदी उपस्थित होते. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे.

3 मशीन सुरू

डॉ. विनायक काळे म्हणाले, मशीनवर चपाती तयार होत असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होत आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने यापूर्वी देखील चपाती मशीन किचन करता मिळाले होते. आता तीन मशीन किचनमध्ये कार्यरत आहेत.

24 स्वयंपाकी

मशिनवर चपात्या तयार होत असल्याने स्वच्छता राखण्यास आणखी मदत होत आहे. तसेच भोजनाची गुणवत्ता देखील उत्तम दिली जात आहे. यामध्ये भोजन, चहा, नाश्ता दिला जाणार आहे. याकरता एकूण 24 स्वयंपाकी व सहाय्यक कार्यरत असून उत्तम व सकस भोजन सेवा विनामूल्य देणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या पाठिंब्यामुळे शक्य होत आहे. 2013 पासून हा प्रकल्प आजपर्यंत अखंडपणे सुरू असून हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...