आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:पुण्यात 3 हजार सार्वजनिक, 2.5 लाख घरगुती गणपतींचे विसर्जन

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात एक ते सात सप्टेंबर यादरम्यान एकूण ३३३ सार्वजनिक गणपतींचे आणि दोन लाख चार हजार ६५३ घरगुती गणपतींचे विसर्जन पार पडले आहे. अनंत चतुर्थीला गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी एकूण २९६९ सार्वजनिक गणपती व दोन लाख २२ हजार ९७७ घरगुती गणपतींचे विसर्जन होणार असल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली आहे. ज्येष्ठांसह मुलांवर लक्ष देण्यासाठी विशेष पथके : गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला व बालके यांच्यावर गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याबाबत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. काही संशयित व्यक्ती अगर वस्तू निदर्शनास आल्यास पोलिस नियंत्रण कक्ष येथे ११२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे सूचित केले.

सीसीटीव्हीद्वारे नजर, पावसाची शक्यता : विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्याद्वारे मिरवणुकीतील प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही कंट्रोल रूममधून नजर ठेवण्यात येणार आहे. आषाढ पालखीप्रमाणे पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची तत्काळ माहिती, वाहतूक बदलाबाबतची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी यादृष्टीने पोलिसांनी ट्विटर आणि सोशल मीडियावर मॅपिंग उपलब्ध करून दिले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मिरवणुकीच्या दरम्यान पाऊसाची शक्यता असल्याने गणेश मंडळे व भाविकांनी तशा प्रकारची तयारी ठेवावी, असे पोलिसांनी सूचित केले आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त मिरवणुकीसाठी ४ अपर पोलिस आयुक्त, १० पोलिस उपायुक्त, २१ सहायक पोलिस आयुक्त, ५५ पोलिस निरीक्षक, ३७९ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, ४ हजार ५७९ पोलिस बंदोबस्त असेल. बाहेरील ४ सहायक पोलिस आयुक्त, १० पोलिस निरीक्षक, ५० सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, २५० कर्मचारी, एसआरपीच्या २ कंपन्या व २६९ होमगार्डचा असा बंदोबस्त आहे.

मानाच्या गणपतीचा थाट पहिला मानाचा कसबा गणपती मंडळात ढोल पथके असणार आहेत. दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी मंडळाचा गणपतीची चांदीच्या पालखीत मिरवणूक निघेल. तिसरा मानचा गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीच्या मिरवणूक सरपाले बंधू यांनी साकारलेल्या भक्तिरथातून निघणार आहे. चौथे तुळशीबाग मंडळ श्री गजमुख रथामध्ये व पाचवे केसरीवाडा गणपतीची नगारावादनाचा गाड्यात मिरवणूक निघेल.

बातम्या आणखी आहेत...