आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंडा:ऑनलाईन जॉबच्या नावाने 30 लाख रुपयांची फसवणूक; पुण्याच्या हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टेलिग्राम अप्लिकेशन्स माध्यमातून ऑनलाइन जॉब देण्याचा बहाणा करून वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास बक्षीस स्वरूपात रक्कम मिळेल असे आमिष दाखवून एका तरुणाची ऑनलाईन तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत भारत राजेंद्र कोळी (वय - 29, राहणार- हडपसर ,पुणे )यांनी तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 7/ 4 /2023 ते 8/ 4/ 2023 यादरम्यान ऑनलाईन घडला आहे. निकिता राजपूत नावाच्या वेबसाईट धारकांनी तसेच त्रिशा ऑफिशियल टाइम्स जॉब्स आणि अमिषा राजपूत टेलिग्राम आयडी धारकांनी तक्रारदार भारत कोळी यांच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर त्यांना टेलिग्राम एप्लीकेशन मोबाईलवर डाऊनलोड करण्यास सांगून वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास दिले. संबंधित टास्क पूर्ण केल्यास तुम्हाला बक्षीस रूपात कमिशन म्हणून आणखी रक्कम मिळेल असे आमिष दाखवले. त्यानुसार वेगवेगळे ट्रांजेक्शन आरोपींनी करून 29 लाख रुपये कोळी यांना गुंतवणूक करण्यास सांगून त्यांना कोणताही परतावा न देता तसेच त्यांचे गुंतवलेले पैसे परत न करता फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे.

ऑनलाइन बँकिंगद्वारे अकरा लाखांचा गंडा

कोंढवा येथे राहणाऱ्या 30 वर्षीय राधिका नारायण कोलते या तरुणीला नोकरी डॉट कॉम वरील डाटा घेऊन टेलिग्राम चैनल वरील महिला रेखा अगरवाल हिने संपर्क साधला. टेलिग्रामवर मेसेज करून आरोपीने टास्क बाबत माहिती देऊन इतर टेलिग्रामवरील ग्रुप यांनी आपसात संगणमत करून तक्रारदार यांना वेगवेगळ्या टास्क बाबत माहिती सांगितली. जास्त नफा मिळण्याचे अमिष दाखवून त्यांनी वेळोवेळी तक्रारदार यांना काहीतरी खोटी कारणे सांगून त्यांच्याकडून ऑनलाइन बँकिंगद्वारे अकरा लाख 25 हजार रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत कोंढवा पोलिस पुढील तपास करत आहे.