आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:कर्जदारांना 300 कोटींचा गंडा ; बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल २०० कर्जदारांची ३०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सचिन पुरुषोत्तम पवार (रा. वाघोली, पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून आरोपी सेलवाकुमार नडार (रा. कोंढवा खुर्द, पुणे) व इतर आरोपींवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांची कर्जे थकली आहेत. अशा आयटीतील लोकांची माहिती प्राप्त केली. त्यानंतर त्यांच्या नावावर एकाच वेळी तीन-तीन बँकांकडून कर्ज काढले. हे पैसे आपल्या अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवी स्वरूपात ठेवले. मात्र, पैसे परत केले नाहीत. आरोपीने एकाच्या नावावर एकाच वेळी ३ बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले. ते काढताना त्यांचे जुने कर्ज फेडले. त्यामुळे त्यांचे सिबिल क्लीन झाल्याने त्यांना कर्ज मिळणे सोयीचे झाले होते.

बातम्या आणखी आहेत...