आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:मेट्रोत 300 विद्यार्थ्यांनी केले देशभक्तीपर गीतांचे समूहगान; ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटतर्फे आयोजन

पुणे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा... ए वतन मेरे आबाद रहे तू... हम होंगे कामयाब... अशा देशभक्तीपर गीतांचे पुणे मेट्रो मध्ये बसून सादरीकरण करत 300 विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवारी आगळीवेगळी मानवंदना दिली. हर घर तिरंगा... अभियानाला प्रतिसाद देत तिरंगी ध्वज हातात घेऊन भारत माता की जय... असा जयघोष करत विद्यार्थ्यांनी मेट्रोची सफर केली.

विद्यार्थ्यांनी गायले देशभक्तीपर गीत

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, मधील चार विभागांतील प्रत्येकी 75 विद्यार्थी याप्रमाणे एकूण 300 विद्यार्थ्यांकरता भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त मेट्रो सफरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, पुणे मेट्रोचे मनोजकुमार डॅनियल, दीपक पिल्ले आदी उपस्थित होते. गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाझ व परतीचा प्रवास करीत विद्यार्थ्यांनी मेट्रोत बसून देशभक्तीपर गीतांचे समूहगान केले.

विद्यार्थ्यांनी घडवला मेट्रोची सफर

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, देशाच्या विकासात मेट्रोचे मोठे योगदान आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीतील मेट्रोचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात इन्स्टिटयूटमधील चार विभागांतील प्रत्येकी 75 विद्यार्थी याप्रमाणे एकूण 300 निवडक विद्यार्थ्यांना मेट्रोची सफर अनुभविता यावी, याकरता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासोबतच अत्यंत आरामदायी प्रवासाची सुविधा देणारी मेट्रो सर्वांनी मोठया प्रमाणात वापरावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बातम्या आणखी आहेत...