आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 3 हजार कोटींवर मालमत्ता कर थकलेला:1 हजार 65 मोठ्या मालमत्तां धारकाकडे थकबाकी; माहिती अधिकारात बाब उघडकीस

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात 1 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांची माहिती मागितली होती. त्याच्या धक्कादायक माहिती समोर आली आहे.1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असणारे फक्त 1065 थकबाकीदार असून त्यांच्याकडे 3330 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे दिसून येत आहे.

वेलणकर म्हणाले, यापैकी 71 केसेस विविध कोर्टांमध्ये प्रलंबित आहेत ज्यामध्ये अडकलेली रक्कम 737 कोटी रुपये आहे. ज्यात फक्त दोन केसेस मध्ये अडकलेली रक्कम 432 कोटी रुपयांची आहे. मोबाईल टॉवरच्या 660 केसेस असून ज्यात अडकलेली रक्कम 1419 कोटी रुपये आहे. ही प्रकरणे पण कोर्टात प्रलंबित असल्याचे मला सांगितले गेले. म्हणजे महापालिकेच्या विधी आणि मालमत्ता कर विभागाने विशेष कक्ष स्थापन करून या सर्व केसेसचा निकाल शीघ्र गतीने लागावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

यातील किमान निम्म्या केसेस चा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला तरी मनपाला एक हजार कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल. या यादीत 105 केसेस “दुबार” कर आकारणीच्या आहेत ज्यात अडकलेली रक्कम 352 कोटी रुपये आहे. ज्याची शहानिशा करून त्या या यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरु करणे आवश्यक आहे. या यादीत 108 केसेस “डीस्पुट” म्हणून दाखवलेल्या आहेत ज्यात अडकलेली रक्कम 344 कोटी रुपये आहे. या केसेस मधील “डीस्पुट” तातडीने सोडवून पैसे वसूल करणे गरजेचे आहे.

यामध्ये 59 कोटी रुपये संरक्षण खात्याची तर 29 कोटी रुपये महावितरणची थकबाकी आहे. या व्यतिरिक्त अन्य 121 केसेस मध्ये 469 कोटी रुपयांची थकबाकी आहे ज्यामध्ये पाटबंधारे खात्याची थकबाकी 68.49 कोटी रुपयांची असून त्याची वसुली महापालिका पाटबंधारे विभागाला देत असलेल्या पाणी पट्टी मधून करणे आवश्यक आहे .

या संबंधीचे पत्र कर आकारणी प्रमुखांनी पाणीपुरवठा विभाग प्रमुखांना तीन वर्षांपूर्वी देऊनही अजून कार्यवाही झालेली नाही . अनेक थकबाकीदारांची प्रकरणे कोर्टात प्रलंबित नसल्याचे दिसत आहे. अशा थकबाकीदारांकडून तत्काळ वसुलीचे प्रयत्न होण्याची गरज आहे. या 1065 बड्या केसेस वर संपूर्ण लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त वसुली साठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकीकडे नियमित कर भरणाऱ्या लाखो नागरीकांना वर्षानुवर्षे मिळणारी 40% सवलत काढून घ्यायची आणि दुसरीकडे मोठी थकबाकी असणाऱ्या मूठभर मालमत्ता धारकांकडून मात्र कराच्या थकबाकीच्या वसुलीचे नगण्य प्रयत्न करायचे हे अक्षम्य आहे.

बातम्या आणखी आहेत...