आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिकलच्या विद्यार्थ्याला लुटले:आधी विवस्त्र करून व्हिडिओ काढला, मग व्हायरल करण्याची धमकी देऊन 30 हजार उकळले

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला धमकावून सुरुवातीला त्याच्याकडील १५ हजार रुपये चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना उघडकीस आली. एवढ्यावरच न थांबता चाेरट्यांनी त्याला एका शेतात विवस्त्र करून ध्वनिचित्रफीत तयार केली. ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन पुन्हा चोरट्यांनी विद्यार्थ्याला एटीएम केंद्रात नेत १५ हजार काढून घेतले.

याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका विद्यार्थ्याने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी (४ डिसेंबर) सायंकाळी विद्यार्थी बारामतीतील सुभद्रा माॅल येथे खरेदी करून वसतिगृहात निघाला होता. त्या वेळी विद्यार्थ्याला चोरट्यांनी अंतरावर अडवून शिवीगाळ करत विद्यार्थ्याच्या खिशातील १५ हजार रुपये काढून घेतले.

पुन्हा एटीएमवर नेत काढून घेतले १५ हजार
चोरट्यांचे दोन साथीदार दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी विद्यार्थ्याला पुन्हा उसाच्या शेतात नेत मारहाण केली. यात त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला. विद्यार्थ्याला विवस्त्र करून चोरट्यांनी मोबाइलवर ध्वनिचित्रफीत केली. चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत त्याला पन्हा एटीएमवर नेत १५ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्याला सोडून दिले. तरुणाने याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगण्यातआले.

बातम्या आणखी आहेत...