आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात व्यावसायिकाला गंडा:कँटीन चालविण्यास देण्याच्या बहाण्याने 31 लाखांची फसवणूक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे स्टेशन परिसरात नवीन कँटीन चालविण्यास देताे असे सांगुन एका व्यवसायिकाची 31 लाख रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नितीन अशाेक शर्मा (वय-36,रा.नवी सांगवी,पुणे) यांनी दाेन आराेपीं विराेधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

याबाबत सुनील जाेधसिंग भदाेरिया (वय-48) व अनीश भदाेरिया (33,रा.पुणे स्टेशन) यांचेवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. सदरची घटना मार्च 2021 ते ऑगस्ट 2022 यादरम्यान घडलेली आहे. तक्रारदार नितीन शर्मा यांना आराेपी सुनील भदाेरिया व अनीश भदाेरिया यांनी नवीन कँटीन चालविण्यास देताे असे सांगितले हाेते. त्याकरिता त्यांच्याकडून वेळाेवेळी 31 लाख दाेन हजार रुपये घेण्यात आले. परंतु त्यांना काेणतेही कँटीन चालविण्यास न देता तसेच त्यांचे पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक करण्यात आली. तसेच पैशाची मागणी केल्यावर त्यांना जीवे मारण्याची धमकी ही आराेपींनी दिली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस पुढील तपास करत आहे.

गुंतवणुकीच्या अमिषाने फसवणूक

पुण्यातील येरवडा परिसरात राहणाऱ्या विजय गुलाब राजरत्न (वय-41) यांचे माेबाईलवर ग्लाेबल ब्राेकर साेल्युशन कंपनीचा वेबसाईट धारक व अन्य दाेन अज्ञात इसमांनी संर्पक करुन शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक केल्यास चांगल्याप्रकारे अल्पावधीत परतावा मिळेल असे अमिष दाखवले.

त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून व्यैक्तिक माहिती व कागदपत्रे आराेपींनी प्राप्त करुन ग्लाेबर ब्राेकर साेल्युशन कंपनीच्या वेबसाईटवर डीमॅट खाते ओपन करुन देवून विविध बँक खात्यंवर एकूण एक लाख 48 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. परंतु सदर व्यवहाराबाबत राजरत्न यांना शंका आल्याने त्यांनी जमा केलेली रक्कम आराेपींकडे परत मागितली असता, आराेपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत रक्कम परत देणार नाही असे सांगत त्यांची फसवणूक केली आहे. सदरचा प्रकार 31/7/2022 ते 3/9/2022 यादरम्यान घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून येरवडा पोलिस ठाण्यात आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...