आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:पुणे स्टेशन परिसरात कँटीन चालवण्यास देण्याच्या बहाण्याने 31 लाख रुपयांची फसवणूक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे स्टेशन परिसरात नवीन कँटीन चालवण्यास देताे, असे सांगून एका व्यावसायिकाची ३१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नितीन अशाेक शर्मा (३६, रा.नवी सांगवी, पुणे) यांनी दाेन आराेपींविराेधात बंडगार्डन पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी बुधवारी दिली आहे. याबाबत सुनील जाेधसिंग भदाेरिया (४८) व अनीश भदाेरिया (३३) यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा पाेलिसांनी दाखल केला आहे. ही घटना मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२२ यादरम्यान घडलेली आहे. नवीन कँटीन चालवण्यास देण्याकरिता त्यांच्याकडून वेळाेवेळी ३१ लाख दाेन हजार रुपये घेण्यात आले. परंतु काेणतीही कँटीन चालवण्यास दिली गेली नाही.

बातम्या आणखी आहेत...