आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:दिल्लीत अडकलेले यूपीएससीचे 325 विद्यार्थी पुण्यात पोहोचले, विद्यार्थी-पालकांनी शासनाचे आभार मानले

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा शिक्का

पुणे - महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी  दिल्ली रेल्वे स्टेशनवरून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन पुणे रेल्वे स्टेशन येथे आज पहाटे  3:10 वाजता पोहोचली. त्यामध्ये एकूण 325 विद्यार्थी पोहोचले, त्यापैकी पुणे जिल्ह्यातील 97 विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत  करण्यात आली. कोविड १९ संदर्भात संशयित आढळले नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा  शिक्का मारून त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये एसटी बस मार्फत पाठविण्यात आले. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बसने पाठवण्यात आले.तसेच काही विद्यार्थी स्वतःच्या वाहनाने घरी गेले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी अमृत  नाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शासनाचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...