आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची 33 लाखांची फसवणूक

पुणे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्स्ट्रक्शन कंपनीत गुंतवणूक केल्यास ठरावीक कालावधीनंतर दुप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखवून निवृत्त बँक कर्मचाऱ्याची ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दाेन आराेपींवर हिंजवडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अंबरनाथ रामभाऊ झरेकर (रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. वृषभ राजेंद्र पवार व राजेंद्र दुर्गा पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अंबरनाथ झरेकर यांना आराेपी राजेंद्र पवार यांनी राेशनी कन्स्ट्रक्शन कंपनीत गुंतवणूक केल्यास सहा महिन्यांत दुप्पट रक्कम देताे, असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानुसार झरेकर यांनी ३३ लाख रुपये वृषभ पवारच्या खात्यावर जमा केले.

बातम्या आणखी आहेत...