आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करणाऱ्या दोन कामगारांनी भरण्यासाठी दिलेल्या 81 लाखांपैकी साडेतीन लाख रुपये न भरता त्याचा अपहरण केला आहे. हा प्रकार 9 जून ते 20 जुलै या कालावधीत पांजरपोळ येथे एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये घडला.
अशोक गजानन पोतदार (वय 39, रा. दिघी,पुणे), भगवान अशोक थोरात (वय 22, रा. लांडेवाडी, भोसरी,पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहे. याप्रकरणी संतोष भगवान उदावंत (वय 43, रा. हिंगणे खुर्द, ता. हवेली,पुणे) यांनी मंगळवारी (दि. 26) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेक्युअर व्हॅल्यूली कंपनीत असिस्टंट मॅनेजर असून ते ऑडिटचे काम करतात. कंपनीच्या व्यवहारांचे ऑडिट करताना 9 जून ते 20 जुलै या कालावधीत आरोपींकडे 81 लाख रुपये पांजरपोळ येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये भरण्यासाठी दिले होते. त्यातील साडेतीन लाख रुपये आरोपींनी एटीएम मध्ये न भरता त्या पैशांचा अपहार केला. तसेच ते पैसे एटीएम मध्ये भरले आहेत, असा रिपोर्ट तयार करून तो कंपनीला देऊन कंपनीची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
पिकिंग व पॅकिंग डिपार्टमेंटमधून वस्तूंची पॅकिंग करून ग्राहकांना पाठवले जात असताना पॅकिंग मधून महागडे मोबाईल फोन आणि घड्याळ काढून एका कामगाराने मोकळे बॉक्स ग्राहकांना पाठवले. ही घटना 7 ते 15 एप्रिल या कालावधीत ऍमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रा ली आंबेठाण येथे घडली. सुहेल हरून तांबोळी (रा. सोलापूर शहर) याच्या विरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुशील उदयसिंहराव गायकवाड (वय 37, रा. बावधन, ता मुळशी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऍमेझॉन सेलर सर्व्हिसेस कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीतून ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तूंना पॅकिंग करून पुढे डिलिव्हरीसाठी पाठवले जाते. आरोपी हा कंपनीत काम करत होता. त्याने ग्राहकांना जाणा-या पॅकिंग वस्तूंची पॅकिंग खोलून त्यातून दोन अॅपल कंपनीचे आयफोन, एक वन प्लस मोबाईल व एक गोकी स्मार्ट वॉच असा एक लाख 84 हजार 338 रुपयांचा माल काढून ग्राहकांना रिकामे बॉक्स डिलिव्हरी साठी पाठवले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.