आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील लोकसंख्येत १८ ते १९ वयोगटातील नवीन मतदारांचा वाटा ३.५ टक्के इतका असून मतदार यादीत केवळ ०.३४ टक्के तरुणाईनेच नोंद केली आहे. यामुळे मतदार नोंदणी तसेच मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने शाळा-महाविद्यालयीन स्तरावर जनजागृतीसाठी निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला अाहे. २० ते २९ वयोगटातील तरुणांची लोकसंख्या १८ टक्के असताना मतदार यादीत १२ टक्के तरुण मतदारांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे १८ ते १९ वयोगटातील सुमारे ९० टक्के आणि २० ते २९ वयोगटातील ३० ते ३५ टक्के मुले-मुली मतदार यादीत नाहीत, असे दिसून अाले अाहे.
पुणे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात स्थापन निवडणूक साक्षरता मंडळाच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती दिली. पुण्यात ७ लाख ६० हजार नवीन मतदारांची नोंदणी आणि ७ लाख १ हजार नावे वगळण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.