आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • 35 Thousand Station Masters Across The Country Will Go On Hunger Strike, 350 Station Masters In Pune Division Will Hold Agitation

आंदोलन:देशभरातील 35 हजार स्टेशन मास्तर करणार अन्नत्याग उपोषण, पुणे विभागातील 350 स्टेशन मास्तरांचे धरणे आंदोलन

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे रेल्वे स्टेशन जवळील रेल मंडल कार्यालय (डीअारएम अाॅफीस) येथे स्टेशन मास्तर आंदोलन

देशभरातील स्टेशन मास्तर त्यांचे विविध मागण्या मान्य व्हावे याकरिता चारवेळा आंदोलन करुन ही रेल्वे प्रशासन गंभीर दखल घेत नसल्याने, स्टेशन मास्तर संघटना आक्रमक झाली आहे. 21 जानेवारी रोजी देशभरातील 35 हजार स्टेशन मास्तर एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करणार असून यामध्ये पुणे विभागातील 350 स्टेशन मास्तर सहभागी होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशन जवळील रेल मंडल कार्यालय (डीअारएम अाॅफीस) येथे स्टेशन मास्तर आंदोलन करुन त्यांचा निषेध नोंदवला.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंदरात्रे, मंडल अध्यक्ष अमित वर्मा, मंडल सचिव शक़ील इनामदार, दिनेश कांबळे, एस के मिश्रा, अजय सिन्हा, अर्जुन कुमार, प्रह्लाद कुमार, मैथ्यू जार्ज, जे आर तांडले, सुनील गुप्ता, मनाली कुलकर्णी हे पदाधिकारी उपस्थित होते.

स्टेशन मास्तरांची रात्रपाळीची सिलिंग मर्यादा रुपये 43600 चा आदेश रद्द करावा आणि एक जुलै 2017चा रिकव्हरी आदेश परत घ्यावा. रेल्वेचे खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करण्यात यावे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आणि काेराेना काळात आघाडीवर राहून रेल्वेत काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच द्यावे अशा स्टेशन मास्तरांचे प्रमुख मागण्या आहे. याअनुषंगाने देशातील स्टेशन मास्तर यांनी ऑल इंडिया स्टेशन मास्तर (एआयएसएमए) च्या अंर्तगत रेल्वे बाेर्ड अधिकाऱ्यांना सात ऑक्टोबर रोजी प्रथम र्इमेल पाठवून विरोध दर्शवला. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी रात्रपाळी दरम्यान देशातील स्टेशन मास्तर यांनी कामाचे ठिकाणी मेणबत्ती पेटवून विरोध दर्शवला. तिसऱ्या टप्प्यात 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान गणवेशावर काळी पट्टी लावून गाडी संचालन करत मागण्या मान्य करावेत अशी विनंती केली. तीन आंदोलने करुन ही दखल न घेतल्याने चौथ्या टप्प्यात 31 ऑक्टोबर रोजी देशातील स्टेशन मास्तर यांनी एकदिवसाचे उपोषण करत विरोध दर्शवला. तर, पाचव्या टप्प्यात स्टेशन मास्तर यांनी धरणे आंदोलन देशभरात केले. सहाव्या टप्प्यात आंदोलन करुन ही रेल्वे बोर्ड दखल घेत नसेल तर यापुढील तीव्र आंदोलनाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील असा इशारा संघटनेने दिली आहे.

रेल्वे प्रशासनाने 29 सप्टेंबर 2020 रोजी घेतलेल्या एका निर्णयानुसार देशातील रात्रपाळी करणाऱ्या स्टेशन मास्तर अधिकारी व कर्मचारी यांचे भत्त्यात कपात करण्याचे निर्देश दिले. यापूर्वी रात्रपाळीकरिता स्टेशनचे दर्जानुसार 8 ते 24 टक्के भत्ता दिला जात होता. परंतु आता 43600 रुपये बेसिक सिलिंग मर्यादा ठेवल्याने त्यापेक्षा अधिक पगार असलेल्यांचा भत्ता कमी होणार आहे. त्याचप्रमाणे 8 मार्च 2018 रोजी रेल्वे बोर्डने आदेश काढून कोणतेही औचित्य नसताना एक जुलै 2017 पासून ज्यांना संबंधित मर्यादापेक्षा अधिक भत्ता दिला गेला आहे ते पैसे रेल्वेला परत करावेत असा अन्यायकारक निर्णय घेतला गेला. बेसिक सिलिंग मर्यादा रद्द करण्यात यावी आणि पैशांचा परताव्याचा निर्णय मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...