आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:पेटीएमवर ऑफर असल्याचे सांगत 35 हजारांचा गंडा

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील वडगावशेरी परिसरातील एका दुकानदारास भामट्यांनी पेटीएमवर साउंड बाॅक्सची ऑफर असल्याचे सांगत ३५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी चंदननगर पाेलिस ठाण्यात एका किराणा दुकानदाराने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आराेपी अजितकुमार अक्षयकुमार पटनाईक (३३, रा.चंदननगर, पुणे) यास पाेलिसांनी अटक केली आहे. तक्रारदाराचे किराणा दुकान असून अजितकुमार याने दुकानात येऊन पेटीएमवर साउंड बाॅक्सवर ऑफर असल्याचे सांगितले. जुन्या साउंड बाॅक्सवर नवीन साउंड बाॅक्स देताे, असे सांगत दुकानदाराचा विश्वास संपादन करून त्यांचा माेबाइल स्वत:कडे घेऊन पेटीएम पाेस्टपेड कार्डमधून परस्पर ३५ हजार रुपये स्वत:च्या खात्यावर वळवून फसवणूक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...