आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकडा वाढतोय:पुण्यात दिवसभरात नवे 36 काेराेनाग्रस्त, तिघांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 246 वर

पुणे3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मृतात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या 30 वर्षीय तरुणाचा समावेश

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी तिघांचा काेरोनाने मृत्यू झाला असून पुण्यात ३४ रुग्ण, तर पिंपरी -चिंचवडमध्ये २ रुग्ण असे एकूण ३६ नवीन रुग्ण सापडले. मृत्यू झालेल्यांपैकी एक मधुमेह असलेली ६७ वर्षीय महिला भवानी पेठ येथील असून दुसरा रुग्ण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील ३० वर्षीय गतिमंद तरुण ॉअाहे. पाच एप्रिल राेजी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते अाणि अति ताण व शरीरातील अवयव निकामी झाल्याने शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

ससून रुग्णालयात सर्वाधिक १९ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला अाहे. पुण्यात अातापर्यंत काेराेनाचे २०९  रुग्ण सापडले असून जिल्ह्यात ११ बाधित अाढळले अाहेत, तर पिंपरी-चिंचवडमध्ये २६ काेराेना रुग्ण सापडल्याने एकूण पुणे परिसरातील काेराेनाबाधित रुग्णांची संख्या २४६ वर पाेहोचली अाहे. शुक्रवारी नायडू रुग्णालयात २० जण काेराेना पाॅझिटिव्ह सापडले असून ससून रुग्णालयात १३ काेराेनाग्रस्तांचा अहवाल पाॅझिटिव्ह अाला. याशिवाय पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात चार नवीन काेराेना रुग्ण सापडले आहेत. सध्या नायडू रुग्णालयात १२१ रुग्ण दाखल असून ससून रुग्णालयात ४४ जण उपचार घेत अाहेत.

शहरातील पाेलिसांच्या गाड्यांना सॅनिटायझेशन करण्यास सुरुवात

काेराेना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पुणे पाेलिस दलातील कर्मचारी व अधिकारी रात्रंदिवस गस्त घालत अाहेत. गस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३०० पेक्षा अधिक पाेलिस वाहनांचे सॅनिटायझेशन करण्यासाठी  बी. यू. भंडारी ग्रुपचे चंद्रवदन भंडारी यांनी पुढाकार घेतला अाहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करणारे पाेलिसदेखील सुरक्षित राहावेत या भावनेतून हा उपक्रम हाती घेतल्याचे भंडारी यांनी सांगितले. पाेलिस अायुक्त के. व्यंकटेशम यांच्या वाहनाचे सॅनिटायझेशन पहिले करून या उपक्रमास सुरुवात झाली.

एकाच कुटुंबातील पाच जण काेराेनामुक्त, एकूण २३ बरे

पुण्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढू लागली असतानाच एका काेराेनाबाधित कुटुंबातील पाच जणांचे १४ दिवसांनंतरचे स्वॅबचे नमुने निगेटिव्ह अाल्याने संबंधित पाच जणांना रुग्णालयातून घरी साेडण्यात अाले अाहे. त्यामुळे अातापर्यंत एकूण २३ जण काेराेनामुक्त झाले असून पुण्यात अातापर्यंत काेराेनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला अाहे. 

दापोलीत होम क्वॉरंटाइन ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

रायगड | रत्नागिरीत दापोली तालुक्यातील एका ५५ वर्षीय होम क्वॉरंटाइन व्यक्तीचा मृत्यू झाला. बुरोंडी खबरदारी म्हणून दापोली प्रशासनाने या मृत व्यक्तीचे स्वॅब नमुने तपासणीस पाठवले आहेत. तसेच या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येणाऱ्या दहा जणांनाही क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. २२ मार्च रोजी मुंबईतून बुरोंडी येथे मृत घरी आला होता. गुरुवारी रात्री शौचास जाऊन आल्यावर त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना उलटी झाली व तोंडातून फेसही येऊ लागला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

रत्नागिरीत ५ जण पॉझिटिव्ह, १४ जणांचे अहवाल प्रलंबित

रायगड | रत्नागिरीमध्ये आणखी एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे २ दिवसांपूर्वी साखरतर या गावातील जी महिला कोरोनाबाधित आढळून आली होती, त्याच महिलेच्या जावेला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित महिला ४९ वर्षांची असून तिच्यावर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आलेल्या महिलेच्या घरातील १४ जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले. यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

पनवेल जिल्ह्यातील खारघरमधील रिक्षाचालकांचा मृत्यू

पनवेल | पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाने पहिला बळी घेतला. खारघर येथील एका रिक्षाचालकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर वाशी येथे उपचार सुरू होते. रिक्षाचालकांची आई, पत्नी आणि मुलीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात १७ आणि पनवेल ग्रामीण भागात ४ असे एकूण २१ कोरोनाचे रुग्ण आहेत. पनवेलमधील २१ रुग्णांपैकी ४ जणांचा अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या रुग्णांमध्ये कामोठे येथील २, खारघर येथील १ आणि कळंबोली सीआयएसएफ जवान १ यांचा समावेश आहे. बुधवारी खारघर घरकुल येथे नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. 

बातम्या आणखी आहेत...