आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षता:सेराे सर्वेक्षणात पुणेकरांमध्ये आढळल्या 36 ते 65 टक्के कोरोना अँटिबाॅडीज, झाेपडपट्टीत बाधा अधिक प्रमाणात

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अँटिजन चाचण्या केल्यावर प्रत्यक्षात कोरोना झाला की नाही हे स्पष्ट हाेते

सेरो सर्वेक्षणात आढळल्या अनेक बाबी कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आरटीपीसीआर किंवा अँटिजन चाचण्या केल्यानंतर प्रत्यक्षात कोरोना झाला की नाही याची स्पष्टता सध्या हाेत आहे. मात्र, अनेकांना कोरोना हाेऊन गेल्याची माहिती नसून त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूविराेधात लढणाऱ्या अँटिबाॅडीज निर्माण हाेत असतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण व संशाेधन संस्था पुणे, ट्रान्सलेशन स्वास्थ्य आणि तंत्रज्ञान संस्था फरिदाबाद व ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय वेल्लाेरमधील संशाेधक, साथीचे राेगतज्ञ आणि वैज्ञानिक यांनी पर्सिस्टंट फाउंडेशनच्या मदतीने पुणे शहरात केलेल्या सर्वेक्षणात पुणेकरांमध्ये ३६ ते ६५ टक्क्यांपर्यंत प्रतिपिंड (अँटिबाॅडी) आढळल्याची माहिती विभागीय आयुक्त साैरभ राव यांनी दिली आहे. या वेळी प्रा.शशिधर, अर्णब घाेष, डाॅ.आरती नगरकर उपस्थित हाेते. यापूर्वी सिराे सर्व्हेतर्फे मुंबई, दिल्ली, अहमदाबाद या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यामध्ये मुंबईत ४० टक्के तर दिल्लीत २७ टक्के अँटिबाॅडी आढळल्या हाेत्या. त्यापेक्षा पुण्यात सुमारे ५१ टक्क्यांपर्यंत अँटिबाॅडी आढळल्या आहेत.

या सर्वेक्षणांतर्गत कोरोनाचा जास्त फैलाव झालेल्या पुण्यातील पाच प्रभागांत सार्स काेवी-२ या विषाणूविरुद्ध तयार हाेणाऱ्या प्रतिपिंड (अँटिबाॅडी)च्या व्याप्तीचा अंदाज घेण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण व अभ्यास करण्यात आला. यात कसबा-साेमवार पेठ, येरवडा, नवी पेठ-पर्वती, रास्ता पेठ-रविवार पेठ, लाेहियानगर- कासेवाडी या पाच प्रभागांतील एकूण १,६६४ व्यक्तींचे रक्ताचे नमुने व इतर माहिती गाेळा करण्यात आली. रक्ताच्या नमुन्यांची चाचणीत अँटिबाॅडीजची तपासणी केली असता, त्यात एखाद्या व्यक्तीस कोरोना हाेऊन गेल्यानंतर शरीरात अँटिबाॅडी आढळतात का, याची तपासणी करण्यात आली. त्याप्रमाणे लाेहियानगर-कासेवाडी भागात ६५.४ टक्के, येरवडा भागात ५६.६ टक्के, रास्ता पेठ भागात ६५.४ टक्के, नवी पेठेत ५६.७ टक्के, कसबा पेठ भागात ३६.१ टक्के अँटिबाॅडी टक्केवारी मिळून आली. वयाेगटानुसार विचार करता १८ ते ३० वयाेगटात ५२.५ टक्के, ३१ ते ५० वयोगटात ५२.१ टक्के, ५१ ते ६५ वयाेगटात ५४.८ टक्के तर ६६ वर्षांवरील व्यक्तीत ३९.८ टक्के अँटिबाॅडी आढळल्या. या अभ्यासात गाेळा करण्यात आलेल्या चाचणीत विषाणूच्या स्पाइक प्राेटीनच्या रिसेप्टर बाइंडिंग डाेमेनला (आरबीडी) ओळखणारी प्रतिपिंडे शाेधण्यासाठी प्रक्रिया करण्यात आली आणि या चाचणीला ‘थेस्टी-आरबीडी-इलाए्सा’ चाचणी म्हणतात व तिची अचूकता याेग्य मानली जाते.

झाेपडपट्टीत बाधा अधिक प्रमाणात

या सर्वेक्षणानुसार स्वतंत्र शाैचालये असणाऱ्या घरातील प्रसार ४५.३ टक्के तर सामायिक शाैचालये वापरणाऱ्यांत ताे ६२.२ टक्के आढळून आला. बंगल्यात राहणाऱ्यांत हे प्रमाण ४३.९ टक्के तर चाळी किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्यांमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ५६ टक्के व ६२ टक्के आढळले. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लाेकांत हे प्रमाण केवळ ३३ टक्के इतके कमी मिळून आले आहे. महिलांमध्ये अँटिबाॅडीचे प्रमाण ५०.१ टक्के तर पुरुषांत ५२.८ टक्के प्रतिपिंडांची व्याप्ती दिसून आली. ६५ वर्षांवरील व्यक्तींत मात्र इतर वयाेगटांच्या तुलनेत ३९.८ टक्केच कोरोनाचा प्रसार दिसून आला आहे. कोरोनाविरुद्धच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या सर्वेक्षणाचा पुढील काळात फायदा हाेणार असल्याचे सांगत विभागीय आयुक्त साैरभ राव म्हणाले, पुणे शहरात ससून आणि बी.जे.मेडिकल महाविद्यालय तर पिंपरी चिंचवडमध्ये डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि वायसीएम यांच्याद्वारे आणखी एक सर्वेक्षण करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...