आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूरतेचा कळस!:वडिलांच्या मित्राकडून 36 वर्षीय महिलेवर बलात्कार; संशयितावर गुन्हा दाखल

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात वडिलांच्या मित्राने एका 36 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 75 वर्षीय आरोपी व्यवसायाने वकील असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आरोपी विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गुन्हा दाखल

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी वसंत धडकु पाटील (वय-75,रा. रोझवूड सोसायटी, शिवाजीनगर,पुणे) या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना मार्च 2019 पासून 18 मे 2022 यादरम्यान पुण्यातील डेक्कन, शनिवार पेठ व कोंढवा परिसरात घडल्याची माहिती पीडीत महिलेने पोलिसांना दिली. आरोपी वसंत पाटील हा पीडित विवाहित महिलेच्या वडीलांचा मित्र आहे. त्याने महिलेस तिची बदनामी करण्याची धमकी देवून तिच्या नवऱ्यास तिच्याबाबत उलट सुलट माहिती सांगण्याची भिती दाखवून तसेच तिच्या मुलाचे बरेवाईट करण्याची भिती दाखवली. तक्रारदार महिलेने आरोपीकडून हेवी डीपॉझीटवर घेतलेला फ्लॅट महिलेच्या नावावर करुन देण्याचे आमिष दाखवून तिला वेगवेगळया ठिकाणी घेवून जावून तिच्या इच्छे विरुध्द जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवण्यात आले. बदनामीच्या भितीने महिलेने याप्रकरणी विलंबाने तक्रार दिल्याची माहिती पोलिसांना दिली. याबाबत पुढील तपास कोंढवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस शिळमकर करत आहे.

महिलांचा विनयभंग करणारा जेरबंद

येरवडा परिसरात अरुण लहु गालफांडे (वय-24) हा तरुण त्याच्या राहत्या घराजवळील वेगवेगळया घरात नग्न अवस्थेत शिरुन महिलांचा विनयभंग करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केलेल्या 32 वर्षीय महिलेच्या घरात बळजबरीने नग्न अवस्थेत शिरुन महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचे तोंड ताबुन तिला गप्प रहाण्यास सांगितले. मात्र, महिला घराबाहेर ओरडत बाहेर अल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपीने अशाचप्रकारे त्या भागातील अन्य तीन घरात ही नग्न अवस्थेत शिरुन तीन महिलांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...