आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हाडाला बिल्डरने गंडवले:वेळेत सदनिका बांधून न देता 4 कोटींची फसवणूक; बांधकाम व्यावसायिकवर गुन्हा दाखल

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात एका बांधकाम व्यवसायिकाने म्हाडाने दिलेल्या मुदतीत घरे बांधून न देता ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित व्यावसायिकाने सुमारे चार कोटी रुपयांची शासनाची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी (05 ऑगस्ट) दिली.

नक्की घटना काय?

या प्रकरणी भूमी कन्स्ट्रक्शनचे पंकज येवला (रा. स्नेहल रेसीडन्सी, चिंचवड,पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाडाचे व्यवस्थापक विजय ठाकूर यांनी याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. म्हाडा तर्फे येवला यांच्या कंपनी मार्फत पिंपरी-चिंचवड परिसरातील रहाटणी येथे भूमी ब्लेसिंग गृहप्रकल्प बांधण्यात येत आहे. जवळपास चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळातील प्रकल्पात 20 टक्के क्षेत्रफळावर विकसकाने म्हाडाला सदनिका उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते. त्याबाबत दोघांमध्ये झालेल्या कारानुसार 21 जानेवारी 2019 रोजी भूमी ब्लेसिंग प्रकल्पातील अठरा सदनिकांची लॉटरी काढण्याच्या प्रस्ताव येवला यांनी सादर केला होता. जून 2019 मध्ये लाभार्थ्यांची यादी निश्चित झाल्यानंतर 15 लाभार्थ्यांना अलॅाटमेंट लेटर देण्यात ही आले होते.

गुन्हा दाखल

दरम्यान, लाभार्थ्यांना बँकेकडून कर्ज मंजूर करण्यात आले. त्यानंतर विकसकास प्रत्येक लाभार्थ्याकडून 60 ते 70 टक्के रक्कम मिळाली. रेरा कायद्यानुसार 30 सप्टेंबर 2020 पर्यंत बांधकाम पूर्ण करून सदनिकांचा ताबा लाभार्थ्यांना देणे बंधनकारक असताना अद्याप एकाही लाभार्थ्याला बांधकाम व्यावसायिकाकडून सदनिकेचा ताबा मिळालेला नाही. यासंदर्भात लाभार्थ्यांनी बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही उपयोग न झाल्याने त्यांनी याबाबत म्हाडाकडे तक्रार दिली. त्यानुसार येवला यांना स्मरणपत्र पाठवण्यात आले होते. त्यानंतरही पंधरा सदनिकांचा ताबा न देता लाभार्थ्यांची आणि सरकारची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केली. यामुळे ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...