आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:रस्त्याच्या किनारी झुडपात सापडले चार महिन्यांचे बाळ, काही तासातच पोलिसांनी घेतला आईचा शोध

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील चांदनी चौक परिसरात चार महिन्यांच्या चिमुरडीला उघड्यावर टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार काल दुपारच्या सुमारास उघडकीस आला होता. माध्यमातून बातमी पसरताच, अखेर सायंकाळी या बाळाच्या कुटुंबियांचा शोध लागला. सध्या ही मुलगी वडिलांच्या ताब्यात असून काही तासातच पोलिसांनी बाळाच्या निर्दयी आईचा शोध घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदनी चौक परिसरात एका झुडपात चार महिन्याची मुलगी सापडली. रडण्याचा आवाज ऐकू येत असल्यामुळे काही नागरिकांनी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले.

सायंकाळपर्यंत माध्यमात याची बातमी येताच बाळाच्या वडिलांनी कोथरूड पोलिसात धाव घेतली आणि ही आपलीच मुलगी असल्याचे सांगितले. सध्या ही मुलगी वडील तुकाराम क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. महिला वारंवार चिडून घर सोडून जात असल्याची माहिती तिच्या पतीने दिली आहे. चार महिन्यांच्या बाळाला रस्त्यात सोडल्याप्रकरणी पोलिसांनी काल रात्री गुन्हा दाखल केला होता. या अंतर्गत पत्नीला अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...