आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढत असतानाच, मुंबईत सोमवारी नव्या व्हेरिएंटचे ४ रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबईत बी.ए. ४ चे तीन तर बी. ए. ५ चा एक नवीन रुग्ण आढळला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला होता.
राज्य सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, मुंबईतील कस्तुरबा प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार, बी.ए .४ चे तीन आणि बी. ए. ५ चा एक रुग्ण आढळला आहे. हे सर्व रुग्ण १४ ते २२ मे २०२२ या कालावधीतील आहेत. त्यामध्ये दोन अकरा वर्षांच्या मुली आहेत. उर्वरित दोन जण ४० ते ६० या वयोगटातील पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत. त्यांचे सर्व तपशील घेण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात सोमवारी १,८८५ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला. ७७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४७,१११ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.११ टक्के झाले आहे.
तपासणीत ९९.५ टक्के नमुने ओमायक्रॉन सब-व्हेरिएंटचे
मुंबई|शहरातील १२ व्या जीनोम सिक्वेन्सिंग मालिकेदरम्यान घेतलेल्या २७९ स्वॅब नमुन्यांच्या तपासणीत २७८ नमुने कोरोनाच्या ओमायक्रॉन सब-व्हेरिएंटचे तर एक नमुना डेल्टा स्ट्रेनचा आढळला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली. महापालिकेने म्हटले आहे की, घेतलेल्या २७९ नमुन्यांपैकी २०२ नमुने मुंबईतील तर उर्वरित मुंबईबाहेरील होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.