आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने 4 रिक्षा, कारला उडवले:भीषण अपघातात 1 ठार 3 जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात हडपसर येथे कंटेनरने चार रिक्षा आणि कारला उडवले आहे. या भीषण अपघातात 1 ठार तर 3 जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की कंटेनर एका झाडाला धडकुन पलटी झाला. हे झाड कोसळून एका नागरिकाच्या अंगावर पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

कंटेनर खाली रिक्षा आल्याने त्याचा चक्काचूर झाला आहे. सध्या क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे. अपघात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अपघात हडपसर येथील गडीतळ येथे झाला आहे. घटनास्थळी पोलिस, अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. दोन जणांना रुगालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पहाटे 6 वाजता झाला.

असा झाला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास अपघात झाला. एक कंटेनर भरधाव वेगाने येत होता. हडपसर येथील गडीतळ येथे हा कंटेनर आला असता याच वेळी चुकीच्या बाजूने एक दुचाकी पुढून आली त्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात कंटेनर चालकाने बाजूला असलेल्या रिक्षावर घातली. मिक्सर कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने मार्गात आलेल्या चार ते पाच रिक्षांना उडवले.

रिक्षात नागरिक अडकल्याची भीती

यानंतर हा कंटेनर एका झाडाला धडकला. ही धडक एवढी भीषण होती की हे झाड देखील कोसळले. यानंतर मिक्सर कंटेनर हा पलटी झाला. यावेळी एक रिक्षा देखील कंटेनर खाली आल्याने रिक्षाच्या चक्काचूर झाला आहे. या रिक्षात काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातामुळे वाहतूक कोंडी

या अपघातात कंटेनर मधील क्लीनर हा मृत्युमुखी पडला आहे. तर 3 नागरिक गंभीर जखमी झाले आहे. मृत्युमुखी आणि जखमींची नवे समजू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीरिक्षा मधील तिघांना बाहेर काढले आहे. ते गंभीर असून त्यांना ससुन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा कंटेनर क्रेनच्या साह्याने बाजूला केला जात आहे. दरम्यान या मार्गावर या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार पहाटे 6 वाजता भरधाव वेगतील एक कंटेनर हा पुण्याच्या दिशेने जात होता. यावेळी गडीतळ येथे एक दुचाकी चुकीच्या दिशेने आली. तिला वाचवण्याच्या नादात कंटेनर चालकाने आजूबाजूच्या वाहनांना धडक दिली आणि कंटेनर हा पलटी झाला. दरम्यान, या अपघातामुळे वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...