आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजी -20 परिषद मध्ये बहुतांश जगातील विकसित देश असून यात 60 टक्के जगाची लोकसंख्या आहे. भारताकडे प्रथमच याचे आयोजन आले असून प्रमुख जगातील देश भारतातील परिषदेस येणार आहे.
दिल्ली येथे मुख्य परिषद पुढील वर्षी सप्टेंबर मध्ये होणार असून भारताने काही देशांना आमंत्रित केले असल्याने एकूण 43 देश या परिषद मध्ये सहभागी होणार आहे. जगातील युद्ध परिस्थिती, अन्न तुटवडा, पर्यावरण आदी समस्यांवर यात चर्चा केली जाणार आहे. असे मत खासदार विनायक सहस्रबुद्धे यांनी गुरवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
काय म्हणाले सहस्त्रबुद्धे ?
सहस्त्रबुद्धे म्हणाले, भारत लोकशाही व्यवस्थेची गंगोत्री आहे ही बाब याद्वारे दाखवली जाणार आहे.भारत हा दक्षिण गोलार्ध मधील नेतृत्व करणारा प्रमुख देश म्हणून विकसित होत आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहे. जागतिक समुदायाला नेतृत्व देणारे ते व्यक्ती असून जगात त्यांचे नेतृत्व मान्य केले जात आहे. विकसनशील देशांचा आवाज प्रभावी करण्याचे काम ते करत आहे. भारतीय संस्कृती दर्शन जगातील लोकांना परिषद माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ ओळख परदेशी पाहुण्यांना करून दिली जाणार आहे.
पर्यावरणाच्या विकासावर भर
इटलीमध्ये ही परिषद झाली तेव्हा कर रचनेवर चर्चा झाली असून सौदी अरेबिया मध्ये विकसनशील देशांना कर्ज सवलत बाबत चर्चा झाली आहे. भारतात यंदा पर्यावरणाचा शश्वत विकास या विषयवार भर दिला जाणार आहे. पर्यावरण आणि विकास अशी तफावत न करता पर्यावरणातमक विकास झाला पाहिजे. ही परिषद देशात 56 ठिकाणी होणार असून महाराष्ट्र मध्ये चार शहरात होणार आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे ऊर्जा सुरक्षा अन्नसुरक्षा आणि जीवित सुरक्षा या त्रिसूत्रीच्या आधारे भारत जगात वाटचाल करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.