आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांजा तस्करांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या:साडेआठ लाखांचा तब्बल 43 किलो गांजा जप्त!

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेसह चौघांना खंडणी विरोधी पथक-2 ने अटक केली. उरळीकांचन आणि लोणीकाळभोरमध्ये दोन कारवाईत त्यांच्याकडून तब्बल साडेआठ लाख रुपयांचा 43 किलो गांजा आणि 12 लाखांच्या मोटारी असा 20 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी मंगळवारी (ता. 7) दिली आहे.

अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर लोणीकाळभोर पोलिस ठाणेच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी उरळी कांचन परिसरात एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने दिनेश सोपान काळे (वय 31 रा. सालचे ता. करमाळा,सोलापूर) याला ताब्यात घेउन त्याच्या मोटारीतून 4 लाख 18 हजार रूपयांचा 20 किलो 750 ग्रॅम गांजा जप्त केला. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत लोणी काळभोर परिसरात मोटारीतून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना पथकाने अटक करण्यात आली आहे. ओंमकार पाडुरंग गुरव (वय 22), अमोल हनुमंत पवार (वय 27) आणि सुरेखा प्रशांत पवार (वय 40) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 4 लाख 31 हजारांचा 22 किलो गांजा जप्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...