आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक:मेडीकल कॉलेजला मुलीचे अ‍ॅडमिशन करुन देतो म्हणत 44 लाखांचा गंडा

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीला मेडीकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला तब्बल 44 लाख 50 हजारांचा गंडा घालत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मयुर शशीकांत मालाणी (रा. किरकटवाडी, सिंहगडरोड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथे राहणार्‍या एका बांधकाम व्यावसायीकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा बांधकाम व्यावसाय आहे. त्यांचे काम महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश येथे चालते. त्याच्या मुलीला मेडीकला अ‍ॅडमीशन घ्यायचे होते. यामुळे ते अ‍ॅडमीशन मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. त्यातच त्यांना मे 2016 मध्ये मयुर मालाणी भेटला. त्याने फिर्यादी यांच्या मुलीला मेडीकलला अ‍ॅडमीशन मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने यापूर्वी मी बर्‍याच जणांचे अ‍ॅडमीशन केल्याचे त्यांना सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी त्याने मागितल्याने विविध बँकेच्या खात्यावर वेळोवेळी तब्बल 44 लाख 50 हजार रूपये पाठवले. पैसे घेऊनही त्याने मात्र कोठेही मुलीचे अ‍ॅडमीशन करून दिले नाही. उलट फिर्यादी यांनी पैसे परत मागितले असता त्याने आज देतो उद्या म्हणत टाळाटाळ केली. या सर्व प्रक्रीयेमध्ये फिर्यादी यांच्या मुलीचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे फिर्यादी यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात धाव घेतली. मालाणीवर फसवणूक व पैशाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मैत्रिण असलेल्या तरुणीवर बलात्कार

सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या तरूणीवर लैंगिक अत्याचार करून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी एकावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश अंकुश विटकर (23, रा. आपले घर सोसायटी जवळ, सर्यप्रकाशनगर, खराडी,पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 27 वर्षीय तरूणीने लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा तपासासाठी येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. डिसेंबर 2018 ते 8 डिसेंबर 2022 दरम्यान हा प्रकार घडला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस कवितके करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...