आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात गुन्हा दाखल:'नासा'त मौल्यवान धातू विक्रीच्या आमिषने व्यावसायिकाला 49 लाखांचा गंडा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील नासात मौल्यवान धातू विक्रीच्या आमिषने एका व्यावसायिकाची 49 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार 19 जून 2019 ते 2 जून 2022 या कालावधीत सुसगाव येथे घडला आहे.

आरोपींवर गुन्हा दाखल

नवनाथ लांडगे (रा. पौड,पुणे), नितीन धोत्रे (रा. भोसरी,पुणे), संजय वळे (रा. पौडगाव, पुणे) आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली जाधव (रा.सांगवी, पुणे), पूजा गरुड (रा.कोथरूड,पुणे), संगीता नगरकर (रा. कोथरूड,पुणे) या तीन महिलांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुभाष गुलाब ससार (वय 49, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

विश्वास संपादन करून...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पूर्वनियोजित कट करुन फिर्यादी, त्यांचा भाऊ प्रकाश गुलाब ससार, राजेश गुलाब ससार यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळवून देण्याचे तसेच आरोपींनी आरपी धातूचे मौल्यवान भांडे नासा अमेरिका येथे विक्री करायचे आहे. असे सांगितले. त्याची किंमत पाच हजार कोटी रुपये मिळणार असून त्यातील फिर्यादी यांना 500 कोटी रुपये फायदा होणार असल्याचेही सांगण्यात आले.

कोरे चेक घेतले...

फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी सरकारी कागदपत्रे आणि त्यावर कोट्यावधी रुपयांची नोंद असल्याचे दाखवले. फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या नावाने तीन कोरे चेक घेऊन फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून वेळोवेळी 37 लाख रुपये आरटीजीएसद्वारे आणि 12 लाख रुपये रोख स्वरुपात घेतले. असे एकूण 49 लाख रुपये आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून घेतले.

जीवे मारण्याची धमकी

आरोपींनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे फिर्यादी यांची गुंतवणूक रक्कम आणि त्यावरील परतावा परत न देता रकमेचा वापर करून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना सावरगाव पौड येथील शेत जमीन कमी भावात विकण्यास भाग पाडले. फिर्यादी यांच्या रकमेचा आरोपींनी अपहार केला. फिर्यादी यांनी त्यांची रक्कम मागितली असता आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच हिंजवडी पोलिस ठाण्यात याबाबतचा पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...