आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे अग्नितांडव:आगीतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडकून 5 लाखांची मदत, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील केमिकल कंपनीतील भीषण आगीत 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पुण्यातील पिरंगुट MIDC परीसरातील एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कारखान्यात काल(7जून) सायंकाळी 5 वाजेदरम्यान भीषण आग लागली. त्या आगीत 15 महिलांसह 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. घटनेवेळी कारखान्यात 37 कर्मचारी काम करत होते. यातील 20 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली.

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले की, "पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही काहींना वाचवता आले नाही. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल.

अजित पवार पुढे म्हणाले की, आग आटोक्यात आली असली तरी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचे प्राथमिक कारण समोर येईल. आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील आणि दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...