आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांवर कारवाई:औंध पोलिस ठाण्यातून लाॅकअपमधून दरोडेखोर पळून गेल्याप्रकरणी सहायक निरीक्षकासह 5 पोलिस निलंबित

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खटाव तालुक्यातील औंध पोलिस ठाण्याचे लॉकअपचे दार तोडून दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील 5 संशयित आरोपी पळून गेल्याप्रकरणी ​​​ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बदे यांच्यासह 5 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहेत.

पाच दरोडेखोर औंध पोलिस ठाण्याच्या लाॅकअपमधून पळून गेल्याची धक्कादायक घटना तीन दिवसांपुर्वी घडली होती. पळून जाण्यासाठी दरोडेखोर आरोपींनी लॉकअपचे दार तोडलेच शिवाय ड्युटीवरील पोलिसांना मारहाण केल्याचीही माहिती समोर आली होती.

घटनेच्या एक दिवस आधीपासून महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे सातारा येथीलच आहेत. त्यात ही घटना घडल्याने सातारा पोलिस अक्षरशः सैरभैर झाले होते.

औंध पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी या संशयित दरोडेखोरांना एका गुन्ह्यात अटक केलेली होती. हे सर्व संशयित पाच जण पोलिस कोठडीत होते. बीड व अहमदनगर जिल्ह्यातील हे संशयित असून त्यांची नावे सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज भोसले अशी आहेत. ही घटना 9 मे रोजी पहाटे घडली, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलिस आता पळून गेलेल्या पाच संशयित आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

आरोपींच्या शोधापुर्वीच कारवाई

लाॅकअपमधून संशयित दरोडेखोर पळून गेल्याची मोठी किंमत औंध पोलिसांना चुकवावी लागली. पोलिस विभागाने संबंधित पोलिसांवर कारवाई केली आहे. ​​​​​​ सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांच्यासह 5 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...