आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्‍त:महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी 5 हजार किलोची मिसळ

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून पुण्यात ५ हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्यात आली. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ तयार केली.

५०० कि. मटकीचा वापर मिसळ बनवण्यासाठी मटकी ५०० किलो, कांदा ३०० किलो, आलं १०० किलो, लसूण १०० किलो, तेल ३५० किलो, मसाला १३० किलो, मिरची पावडर २५ किलो, हळद पावडर २५ किलो, मीठ २० किलो वापरले.