आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा५० हजार रुपयांमध्ये इयत्ता दहावीचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि सांगली येथे ही टोळी कार्यरत असून पाचवी ते सातवीदरम्यान नापास झालेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता आयतेच दहावीचे बनावट प्रमाणपत्र देण्याचा हा गैरप्रकार पुणे पोलिस भरती प्रक्रियेवळी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात कळला. त्यानंतर सुमारे दोन-अडीच महिने तपास केला. पोलिसांनी पाचवी नापास एका तरुणाला डमी विद्यार्थी बनवून ५० हजारांत बनावट प्रमाणपत्र मिळवत या टोळीचा भंडाफोड केला. छत्रपती संभाजीनगरातून ३० आणि सांगलीतून ५ अशी एकूण ३५ बोगस प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली.
पाचवी नापासाला डमी विद्यार्थी बनवून मिळवले प्रमाणपत्र पुण्याच्या भवानी पेठेतील विकी कांबळे या पाचवी नापास तरुणाचे दहावी उत्तीर्णचे प्रमाणपत्र बनवण्याचे ठरवण्यात आले. कोरोना काळानंतर विविध शासकीय खात्यांत निघालेल्या नोकरभरतीसाठी दहावी प्रमाणपत्र हवे असल्याचे भासवण्यात आले. यासाठी आरोपी संदीप कांबळेशी संपर्क साधला. त्याने ६० हजार रुपये घेऊन विकीच्या हाती थेट महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयाची दहावीची बनावट गुणपत्रिका, प्रमाणपत्र थेट सांगलीहून आणले. पुण्यातील स्वारगेट भागात हे बोगस प्रमाणपत्र देतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांनी दिली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यातील अंमलदार राहुल बाळासाहेब होळकर यांनी तक्रार दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
पोलिस आणखी काही साथीदारांच्या मागावर, राज्यभर व्याप्ती, कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय याप्रकरणी सांगली येथील आरोपीच्या ताब्यातून पाच आणि छत्रपती संभाजीनगरच्या आरोपीकडून संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयाचे ३० असे एकूण ३५ बनावट सर्टिफिकेट पोलिसांना मिळालेले आहेत. या गुन्ह्यात आरोपीचे आणखी काही साथीदार संभाजीनगर आणि सांगली या ठिकाणी असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांचे पथक रवाना झालेले आहे. सकृतदर्शनी यामध्ये सुमारे १७ ते १८ लाखांची उलाढाल झाल्याचे दिसत असून एकूण प्रकरणाचे गांभीर्य व राज्यभर व्याप्ती पाहता कोट्यवधींचा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आरोपींची आॅफर : ५० हजारांत घरबसल्या मिळाली ही प्रमाणपत्रे डमी विद्यार्थी विकी कांबळेला अारोपी संदीपने सांगली येथील महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयात प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर त्याला मायग्रेशन प्रमाणपत्र दिले. त्याचे हाॅलतिकीट बनवले. विद्यार्थी परीक्षेलाही बसल्याचे दाखवले व नंतर दहावीची गुणपत्रिका आणि उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र विकीच्या हाती सुपूर्द केले.
छत्रपती संभाजीनगरात ३०, सांगलीत ५ प्रमाणपत्रे जप्त, १७.५० लाखांची उलाढाल
हेच ते बनावट प्रमाणपत्र
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.