आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:सराईत गुन्हेगाराकडून साडेसात लाखांचा 52 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त; अंमली पदार्थ विक्री प्रकरणात चार गुन्हे दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येरवडा परिसरात अंमली पदार्थ विक्री करणारा एका सराईत गुन्हेगारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. याप्रकरणी समीर आयबा शहाजहान शेख (३८, रा, पुणे) या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ७ लाख ८१ हजार रुपये किमतीचा ५२ ग्रॅम ०९० मिलिग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ, ५ हजार रुपये रोख, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, मोबाइल फोन, प्लास्टिक पिशव्या असा एकूण ७ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांनी शनिवारी दिली. संबंधित आरोपी हा मूळ मुंबईच्या असून गत ४ वर्षांपासून तो पुण्यातील वेगवेगळ्या भागांत राहत आहे. त्याच्यावर यापूर्वी पुण्यात अंमली पदार्थ विक्री प्रकरणात चार गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...