आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुलना:कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत बारावीच्या निकालामध्ये या वर्षी 5.37 टक्के वाढ, यंदाचा निकाल 91.25 टक्के

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सन २०१९ मध्ये राज्याचा निकाल होता ८५.८८ टक्के,

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाने गुरुवारी जाहीर केला. या वर्षी बारावीच्या निकालाची राज्याची टक्केवारी ९१. २५ आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक (९६.०१ टक्के) तर मुंबई विभागाचा निकाल (८८.१३ टक्के) सर्वात कमी लागला आहे. यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत २.९७ टक्के घट आहे. परंतु कोरोनामुक्त वातावरणात पार पडलेल्या या परीक्षेत सन २०१९ ची तुलना करता राज्याचा निकाल ५.३७ टक्के वाढ झाली आहे.

विभागीय मंडळांनुसार निकाल

  • कोकण९६.०१%
  • पुणे९३. ३४%
  • कोल्हापूर९३.२८%
  • अमरावती९२.७५%
  • नाशिक९१.६६%
  • लातूर९०.३७%
  • नागपूर९०.३५%
  • मुंबई८८.१३%

टक्केवारीपेक्षा गुणात्मक वाढीचेसंकेत देणारा यंदाचा निकाल
राज्य मंडळाने गुरुवारी जाहीर केलेला इयत्ता बारावीचा निकाल, त्यातील आकडेवारी पाहिल्यास, गेल्या काही वर्षांच्या गुणफुगवट्याच्या पार्श्वभूमीवर, गुणात्मक वाढीचा संकेत देणारा हा निकाल आहे, असे मानण्यास जागा आहे. राज्याचा निकाल ९१. २५ टक्के लागला आहे. कोरोना संकटाच्या काळात आणि नंतरच्या वर्षी, राज्य मंडळाने परीक्षेसाठी अनेक सवलती दिल्या होत्या. अभ्यासक्रमातील २५ टक्के भागावर प्रश्न विचारले गेले नव्हते. तसेच शाळा हेच परीक्षा केंद्र, ही सवलत होती.

निकालाची वैशिष्ट्ये
एकूण १५४ विषयांची परीक्षा सहा माध्यमांतून पेपर लेखन २३ विषयांचा निकाल १०० टक्के खासगी विद्यार्थ्यांचा निकाल ८२.३९ टक्के ६०७२ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट, उत्तीर्ण ९३.४३ टक्के रिपीटर्सचा निकाल ४४.३३ टक्के छत्रपती संभाजीनगर : ९१.८५%
गेल्या पाच वर्षांमधील निकालाची आकडेवारी
२०१८ ८८.४१ टक्के
२०१९ ८५.८८ टक्के
२०२० ९०.६६ टक्के
२०२१ ९९.६३ टक्के
२०२२ ९४.२२ टक्के
२०२३ ९१.२५ टक्के

मुलांच्या तुलनेत मुलींचे पासिंग प्रमाण ४.५९ टक्के
गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत निकालात २.९७ टक्के दिसून आली घट