आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता हीच सेवा:स्वच्छ टेकडी अंर्तगत पुण्यातील 15 टेकडयांवर 550 बॅग कचरा संकलित, उपक्रमाची सांगता सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टेकडी संर्वधन मध्ये लाेकसहभाग वाढावा यादृष्टीने पुणे वन विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरणा दिनाचे औचित्य साधून शनिवार व रविवार या दाेन दिवशी ‘स्वच्छ टेकडी’ उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये एक हजार 974 स्वयंसेवक सहभागी हाेत त्यांनी पुणे व आजूबाजूच्या परिसरातील 15 टेकडयांवर 550 बॅग कचरा संकलित केला आहे.

पुणे वन विभागाच्या अख्त्यारित असलेल्या हनुमान टेकडी, वेताळ टेकळी, हिंगणे, म्हाताेबा टेकडी, घाेराडेश्वर टेकडी, वारजे टेकडी, किल्ले सिंहगड, महम्मदवाडी, तळजाई, बावधन, वानवडी, लाेहगाव, धानाेरी याठिकाणी ही माेहीम राबवली. सदर भागातील विविध स्वयंसेवी संस्था, विविध टेकडी ग्रुप, पर्यावरणा विषयक आवड असणारे अनेक नागरिक या उपक्रमात सहभागी झाले हाेते. यापुढील काळात ही सदरचा उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी सात ते नऊ वाजता विविध टेकडयावर राबवला जाणार असल्याची माहिती वन अधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे.

या उपक्रमात प्रथमच माेठया प्रमाणात स्वंसेवक सहभागी झाले असून त्यांचे प्रमाण आगामी काळात आणखी वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे वन विभागाने सांगितले आहे. या उपक्रमाची सांगता खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत वारजे येथील संजीवन वन उद्यान येथे करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...