आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक खात्यात 2 कोटी पाठवण्याचे दाखवले आमिष:महिलेच्या खात्यातून 57 लाख केले वळते, गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन ओळखीवरून एका 64 वर्षीय महिलेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सदरील घटनेत महिलेल्या बँक खात्यात परदेशातून दोन कोटी रुपये पाठवण्याच्या बाहण्याने खात्यातून 57 लाख 79 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली.

गुन्हा दाखल

याप्रकरणी दीपा प्रकाश जोशी (वस-64) यांनी सायबर पोलिस ठाण्यात 6 अनोळखी मोबाइल धारक व आरबीआय कस्टमर इन्क्वायरी नावाच्या ईमेल आयडी धारकाविरोधात आर्थिक फसवणूक व आयटी अ‍ॅक्ट 66 सी, 66 डी नुसार गुन्हा मंगळवारी दाखल केला. सदरील या घटनेची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे. तसेच हा प्रकार 8 डिसेंबर 2021 ते 6 जून 2020 दरम्यान घडला.

पैशाचे दाखवले आमिष

दीपा जोशी यांच्याशी इरिक ब्राऊन या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून संर्पक साधला. तो परदेशात काम करत असल्याचा बहाणा करून त्याने ज्येष्ठ नागरिक महिलेशी मैत्री करुन त्यांना महागडे गिफ्ट पाठविण्याचा बहाणा केला. तसेच त्यांच्या बँक खात्यात दोन कोटी रुपये पाठविण्याचे अमिष दाखवले.

आरबीआय बँकेकडून आशा कुमारी या नावाने एका महिलेने बोलत असल्याची बतावणी करून आरबीआय बँकेच्या मेल आयडीचे सार्धम्य असलेल्या मेल आयडीवरून मेल करून तक्रारदार यांना विविध कारणासाठी धमकी व भीती दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी 57 लाख 79 हजार रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आाली आहे. महिलेस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. या गुन्हयाचा पुढील तपास सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कुमार घाडगे करत आहे.

पावणेदोन लाखांचा गंडा

पुण्यातील कात्रज परिसरात राहणाऱ्या 61 वर्षीय श्रीहास रामचंद्र चुनेकर यांना अनोळखी इसमाने आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगुन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या डेबिट कार्डचा पिन नंबर व डेबीट कार्डच्या मागील बाजुस असणारा सीवीसी नंबर घेऊन त्यांच्या खात्यावरून पर्सनल लोन घेवून त्यांची एकूण एक लाख 81 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...