आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:सावकाराकडून 1 लाखाच्या बदल्यात 6 लाख वसूल, सावकाराला पोलिसांनी अटक केली

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध सावकाराकडून एक लाखाच्या बदल्यात ६ लाख रुपये वसूल केल्यानंतर आणखी अडीच लाखांची मागणी करून धमक्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. या अवैध सावकाराला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात ३५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार नागराज ऊर्फ नागेश रत्नाकर नायकोडी (२४, शनिनगर, जांभूळवाडी रोड, पुणे) या सावकाराला अटक केली आहे. तक्रारदार यांनी आरोपीकडून १५ टक्के व्याजदराने १ लाख रुपये घेतले होते. त्याच्या बदल्यात त्यांनी ऑनलाइन आणि फोनपेद्वारे ५ लाख ९५ हजार रुपये दिले होते. तरीही तक्रारदारास दंड आणि व्याजापाेटी आणखी अडीच लाखांची मागणी केली जात होती. त्यांच्या घरात घुसून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तक्रारदार व त्यांच्या पत्नीस व्याज दिले नाही म्हणून आराेपी शिवीगाळ करत होते.

बातम्या आणखी आहेत...